Lagnautsav महाराष्ट्राचे पहिले संपूर्ण वेडिंग मार्केटप्लेस ‘लग्नउत्सव.कॉम’ गुढीपाडव्यापासून सेवेत 

मुंबई/पुणे | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्रातील लग्न सोहळ्यांची परंपरा आणि भव्यता आता डिजिटल क्रांतीशी जोडली जाणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आणि संपूर्ण राज्यातील लग्न व्यवसायाला एकाच छताखाली आणण्यासाठी मिडिया वन कंपनी’ ने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे पहिले संपूर्ण वेडिंग मार्केटप्लेस — Maharashtra 1st Wedding Marketplace ‘लग्नउत्सव.कॉम’ (Lagnautsav.com) — चा भव्य राज्यव्यापी श्री गणेशा होत आहे.

काय आहे ‘लग्नउत्सव.कॉम’ची संकल्पना? हे केवळ एक वेब पोर्टल नसून, महाराष्ट्रातील वधू-वर आणि लग्न व्यवसायातील सेवा पुरवठादार यांच्यातील एक भक्कम दुवा आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांपासून ते निमशहरी भागांतील भव्य मंगल कार्यालये, प्रिमियम रिसॉर्ट्स, केटरर्स, प्रोफेशनल फोटोग्राफर, नामांकित पुरोहित, बँड पथके आणि इतर सर्व सेवा आता एकाच ‘क्लिक’वर उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील लग्न संस्कृतीला जागतिक दर्जाचे डिजिटल व्यासपीठ मिळवून देणे हे या पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील ‘निवडक’ वेंडर्सनाच संधी! गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, प्रत्येक शहरातून आणि प्रत्येक कॅटेगरीमधून केवळ ‘टॉप टेन’ (Top 10) प्रिमियम वेंडर्सचीच निवड या पोर्टलवर केली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना खात्रीशीर आणि दर्जेदार सेवा मिळेल, तर निवडक वेंडर्सना मार्केटमध्ये एक ‘ब्रँडेड’ ओळख प्राप्त होईल. विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्र वन न्यूज’च्या वतीने नोंदणीकृत वेंडर्ससाठी ‘प्रो-कॅमेरा’ शूटद्वारे विशेष व्हिडिओ प्रमोशनची सुवर्णसंधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय घराघरात पोहोचेल.

ग्राहकांसाठी ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ आता महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून लग्नाचे बजेट, ठिकाण आणि वेंडर्सच्या कामाची तुलना करून ग्राहक आपल्या पसंतीची सेवा निवडू शकतील. मध्यस्थांशिवाय थेट वेंडरशी संपर्क साधता येणार असल्याने पारदर्शक व्यवहार आणि वेळेची बचत होणार आहे.

नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू! गुढीपाडव्याला होणाऱ्या या महा-शुभारंभासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेंडर्सची नोंदणी सध्या वेगाने सुरू आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्याने, आपल्या व्यवसायाला महाराष्ट्राच्या नकाशावर डिजिटल पद्धतीने चमकवण्यासाठी व्यावसायिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन ‘लग्नउत्सव’ टीमच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाला ‘महाराष्ट्र ब्रँड’ बनवण्यासाठी आजच संपर्क साधा: 📞 संपर्क: 93563 16221 🌐 वेबसाईट: www.lagnautsav.com (महाराष्ट्र वन न्यूजचा एक विश्वसनीय राज्यव्यापी उपक्रम)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top